UP | HOME

विज्ञान केंद्र
Experiment, question and seek…

Table of Contents


Vidnyan Kendra

Activities

It has following activities:

 • Studying science and technology so that it is environment-friendly.
 • Do research and development in the fields which are directly related to human life and is environment friendly.
 • Release technology developed at Vidnyan Kendra under Free/Open licences.
 • Train people to produce things based on Vidnyan Kendra Technology.
 • Create, use and promote Free and Open source software.
 • Write and publish articles related to environment-friendly science and technology on internet, and through booklets.
 • Write, publish articles and booklets mainly in Marathi to sperad science and technolgy in local language for local people. If you are interested in the projects but don't understand Marathi, please contact us.

विज्ञान केंद्र

विज्ञान केंद्र ही जन विज्ञान चळवळ आहे. या चळवळीची उद्दिष्टे अशी आहेतः

 • पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विज्ञानाचा अभ्यास करणे.
 • पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान विकसित करणे.ते साऱ्यांसाठी खुले करणे व त्याचा प्रसार करणे.
 • नव्या मुक्त संगणक प्रणाली लिहिणे. अस्तित्वात असलेल्या मुक्त संगणक प्रणालींचा प्रसार करणे.
 • विज्ञान केंद्र निर्मित पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे.
 • पर्यावरण व तंत्रज्ञानाविषयी लेखन करणे. ते साहित्य (पुस्तिका व लेख) प्रकाशित करणे.
 • विज्ञान केंद्राच्या उपक्रमांविषयी व विकसित केलेल्या तंत्रज्ञाना विषयी इंटरनेटवर माहिती प्रकाशित करणे.
 • सर्व प्रकल्प पुस्तिका, लेख व माहिती मराठीत प्रसिद्ध करणे आणि स्थानिक पातळीवर या तंत्रज्ञानाचा प्रसार करणे. या प्रकल्पांमधे तुम्हाला रस असेल पण तुम्हाला मराठी येत नसेल तर आमच्याशी संपर्क साधा.

मुक्त प्रकल्प

विज्ञान केंद्राने आजवर काही प्रकल्प विकसित केले आहेत. व ते विविध मुक्त परवान्यांचा वापर करून सर्वांसाठी खुले केले आहेत. ते तुम्हाला पुढील ठिकाणी मिळतीलः

 • हिरवी मायाः स्वयंपाकघरातील कचऱ्याचे संपत्तीत रूपांतर करणारा बगीचा संच
 • सन-टाइमः सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळे नुसार विद्युत उपकरणे बंद चालू करणारी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा
 • अंतर्गोल आरशाची सूर्यचूलः कोणत्याही आकाराचा अंतर्गोल आरसा चकचकीत सपाट पृष्ठभागापासून बनवण्याचा प्रकल्प.

सामील व्हा…..

तुम्ही विज्ञान तंत्रज्ञानाचे विद्यार्थी असाल किंवा नसाल. तुम्हाला विज्ञान केंद्राच्या कामात अशा रीतीने सहभागी होता येतेः

 • विज्ञान केंद्राच्या उद्दिष्टांशी सुसंगत असा नवा प्रकल्प सुचवा.
 • चालू असणाऱ्या विज्ञान केंद्र प्रकल्पात भाग घ्या.
 • विज्ञान केंद्र निर्मित पुस्तिका इतरांना भेट द्या.
 • विज्ञान केंद्राने निर्माण केलेल्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण द्या किंवा घ्या.
 • विज्ञान केंद्रासाठी वैज्ञानिक वा तंत्रज्ञान विषयक लेखन करा.

Contact us at:
vidnyanmail.png


Author: Prasad KB

Created: 2018-03-02 Fri 12:00